दैनंदिन व्यवस्थापन, प्रशासन, आदीसाठी पैशांची नितांत आवश्यकता भासते. आपण कुसुमाग्रज प्रतिष्ठानसाठी अनेक प्रकारे सहकार्य करू शकाल, जसे
१०००/- भरून आजीव सदस्य होणे.
- ५००००/- भरून संस्थांनी आजीव सदस्य होणे.
- आपल्या आर्थिक क्षमतेनुसार जास्तीत जास्त देणगी प्रतिष्ठानला देणे. ह्या देणग्यांना आयकरातून सवलत मिळते.
- इमारत सुसज्ज करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून देणे.
- इमारतीपुढील उद्यान तयार करून देणे
- ग्रंथालयाचा विस्तार करणे.
- साखळी वाचनालय चालविणे.
- साहित्यभूषण पुरस्कार, व्याखाने, परिषदा, मेळावे, ह्यांचे प्रायोजकत्व स्विकारणे.
मा. तात्यासाहेबांना समाजातील अज्ञान अंधकार दूर व्हायला हवा होता. समता, बंधुत्व, सहानभुती, जिव्हाळा, प्रेम हे सार्या समाजामध्ये असावे ही त्यांची तीव्र उत्कट इच्छा असे. प्रेमाला ते सार्या संस्कृतीचा सारांश मानत. त्यांच्या प्रेरणेने आणि इष्टमित्रांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या ह्या प्रतिष्ठानला आपण स्वत: आणि आपल्या स्नेह्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले, तर त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणता येतील. त्यासाठी हे आपल्याला स्नेहपूर्ण आवाहन, आपण प्रतिसाद द्याल ह्या खात्रीने केलेलं !
संपर्क
विश्वस्त मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
तरणतलावामागे, टिळकवाडी, नाशिक.
दूरध्वनी :- २५७६१२४, २५७६१२५
(न्यास नोंदणी पत्र क्र. इ. ५६४)
|