विनम्र आवाहन,

आपल्या सगळयांच्या मनात आदराचे स्थान असणार्‍या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजाचे स्मारक नाशिक येथे निर्माण होत आहे. एक लोकमान्य व्यक्तिमत्व म्हणून मराठी माणसांना तात्यासाहेबांशी अलौकिक मानवतेचे नाते जोडता आले. आपले कार्य साहित्याच्या मर्यादेत बंदिस्त न ठेवता व्यापक समाजहित साध्य करण्याचा त्यांचा ध्यास अनोखा होता.

वेगवेगळया क्षेत्रात काम करणार्‍या सर्व थरांतील माणसांपर्यंत त्यांचे स्नेहबंध जुळलेले होते. ह्या स्मारकाच्या रूपाने मानवतेच्या मूल्यांची जपवणूक करणे हा ह्या स्मारकाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी स्मारक योजनेस सक्रिय आर्थिक सहभाग देण्याचे निश्चित केले आहे.

एकूण साडेतीन कोटी रुपयांच्या ह्या प्रकल्पात वरील दोन संस्था एक कोटी रूपये उपलब्ध करून देणार आहेत. उर्वरित रक्कम उभी करण्याची जबाबदारी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने स्वीकारलेली आहे. ह्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागातील विविध स्तरावरील संस्था व व्यक्ती ह्यांचे पर्यंत पोहचून हा निधी संकलन करण्याचा संकल्प कुसुमाग्रज प्रतिष्ठानने केला आहे.

जनसामान्यांपासून अंतरिच्या जाणिवेने केलेल्या सर्व लहान मोठ्या देणग्यांच्या रूपाने हा प्रकल्प सिध्द होईल अशी खात्री आहे. स्मारकाच्या संकल्पनेविषयी आणि त्यातील विविध दालनांविषयी माहिती सोबत दिलेली आहे. आपण ह्यात कोणत्या स्वरुपात सहभागी होऊन निधी देऊ शकाल ह्या संबंधीच्या विविध योजनांचीही माहिती दिलेली आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजाचे हे स्मारक म्हणजे साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती व समाज प्रबोधन ह्या सर्वांसाठीचे केंद्र म्हणून सिध्द झाल्यावर आपण सगळेच जाणतेपणाने त्यांची स्मृती चिरंतन ठेवू अशी खात्री आहे.

न्या. चंन्द्रशेखर धर्माधिकारी - अध्यक्ष ०२२-२२०४४७१६

श्री. हेमंत टकले - अध्यक्ष २५७२२३-३५
श्री. विलास लोणारी २५७०९७०
श्री. माधवराव पाटील २५७५७००
श्री. शिवाजी पाटील २५७५३६७, ९८२२०२८२५५
श्री. संजय पाटील २५८०१६४, २५७४८३४
श्री. विजय सोहोनी २५७०८२२, २३४१७६१
श्री. विजय संकलेचा २४६१९६६
   
Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By CyberEdge Solutions.