जन्मशताब्दी
प्रतिष्ठान विषयी
विश्वस्त मंडळ
पुरस्कार
उपक्रम
सह्कार्य
स्पर्धा
साहित्यभूषण परीक्षा
पाथेय त्रैमासिक

संगीत स्पर्धा - २०१६

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) व उपशास्त्रीय संगीत, गायन खूल्या स्पर्धा.

१७ व १८ सप्टेंबर २०१६ रोजी आयोजित स्पर्धेचा अंतिम निकाल.

ख्याल गायन शास्त्रीय संगीत स्पर्धा - २०१६
प्रथम - स्नेहल नेवासकर
द्वितीय - श्वेता देशपांडे
तृतीय - अमन घोरमाडे

उपशास्त्रीय संगीत स्पर्धा - २०१६
प्रथम - सरस्वती बोरगांवकर (लातूर)
द्वितीय - स्नेहल नेवासकर (पुणे), जगदिश चव्हाण (नाशिक)
तृतीय - अमित नेसरीकर (मुंबई), आशुतोष खराडे (अ.नगर)

आयोजक - कुसुमाग्रज प्रतिष्ठान


kusumagraj
नियमावली :
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) स्पर्धा :
१. वयोगट - १८ वर्षाच्या पुढील कुणीही व्यक्ती स्पर्धेत भाग घेऊ शकते.
२. किमान ४ वर्ष शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले असावे.
३. शास्त्रीय संगीतासाठी प्रवेश फी ३००/- आहे.
४. स्पर्धकाने आपल्या आवडीचे सहा राग पसंती क्रमानुसार कळवावे. त्यापैकी कुठलाही एक राग परीक्षक गावयास सांगतील.
५. ख्याल गायनासाठी एकूण वेळ २० मिनिटे असेल. १५ मिनिटांनंतर सूचना दिली जाईल. २० मिनिटांनंतर गायन थांबवावे लागेल. (यात १५ ते १७ मिनिटे मोठा ख्याल व उर्वरित वेळेत छोटा ख्याल अपेक्षित आहे.)
 
उपशास्त्रीय गायन स्पर्धा : (नाटयगीत, ठुमरी, टप्पा, दादरा, होरी, चैत्ती, कजरी यापैकी कोणतेही एक)
१. वयोगट - १८ वर्षाच्या पुढील कुणीही व्यक्ती स्पर्धेत भाग घेऊ शकते.
२. गायनासाठी एकूण वेळ ७ मि. ५ मिनिटांनंतर सूचना दिली जाईल. ७ मिनिटांनंतर गायन थांबवावे.
३. उपशास्त्रीय गायन स्पर्धेसाठी प्रवेश फी रूपये २००/- आहे.
 
पारितोषिके -
* शास्त्रीय संगीतासाठी   * उपशास्त्रीय संगीतासाठी
प्रथम क्रमांक रुपये - १०,०००/-   प्रथम क्रमांक रुपये - ७०००/
द्वितीय क्रमांक रूपये - ७,०००/-   द्वितीय क्रमांक रुपये - ५०००/-
तृतीय क्रमांक रूपये - ५,०००/-   तृतीय क्रमांक रूपये - ३०००/-
 
१. दोनही स्पर्धासाठी हार्मोनियम, तबला ही वाद्ये व साथीदार संस्थेतर्फे देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍याच्या वापरास परवानगी आहे. किंवा स्पर्धकाने स्वत: तानपुरा घेऊन गायन सादर करावयाचे आहे.
२. स्पर्धेचे वेळी ध्वनिक्षेपण यंत्रणा नसेल.
३. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल.
४. स्पर्धेस उपस्थित राहण्यासाठी प्रवास, निवास, भोजन व्यवस्था स्पर्धकाने करावी.
५. स्पर्धा कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करण्याचे अधिकार संयोजकांकडे आहेत.
६. सर्व स्पर्धा कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास चौक, गंगापूर रोड, नाशिक येथे होतील.
७. स्पर्धकाची सहभागाची वेळ व तारीख नंतर कळविली जाईल.
८. बाहेरगावच्या स्पर्धकांनी प्रवेश फी मनीआर्डर किंवा डिमांड ड्राफ्टने कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड नाशिक-४२२०१३ या पत्यावर पाठवावी. (ड्राफ्ट कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या नावाने पाठवावा.)
९. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख १०/०९/२०१६ आहे.
१०. अधिक माहितीसाठी ०२५३/२५७६१२५, मो. ९४२२२६१००५, प्रवेश अर्ज वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ई-मेल-, वेबसाईट-
११. प्रवेश अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
१२. तुमचा क्रमांक किती तारखेला आहे ते फोनवर कळविले जाईल तसेच विजेत्यांना फोनवर निकाल कळविला जाईल.
 
  प्रवेश अर्जासाठी इथे क्लिक करा.
   
  पारितोषिक वितरण समारंभ तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

Copyright 2010, Kusumagraj Pratishthan, Nashik. All Rights Reserved.
Site Designed & Maintained By Cyberedge Web Solutions Pvt. Ltd.